ता. १५-२-२०२४:
शेवटी निघायचा दिवस आला. प्रतीक ९. ३० लाच साधना आणि राजेंद्र रावांना आणायला गेला. माझे जवळपास १५ डाक होते. काही "handle with care" असे तर काही साधे. इंनोवा बरोबर १०.१५ ला आली. मुक्कामी टॅक्सी सहित राहायचं असलं कि ड्राइवर कसा आहे हे खूप महत्वाचं असतं. प्रफुल्ल नावाचा ड्राइव्हर होता, चांगला होता. आधी तर इंनोव्हा तही सगळं सामान मावेल कि नाही असं वाटत होत पण मावलं आणि १०. ४५ ला आम्ही निघालो. मधून मधून एखादी बॅग अंगावर येत होती पण आम्ही तिला प्रेमाने मागे करत होतो. ठरल्या प्रमाणे रात्री साडेनऊला मनीषाकडे, सामान उतरवून नंतर संध्या कडे पोहोचलो. रात्री मस्त खिचडीचा बेत होता. जेऊन झोपलो.
ता. १६-२-२०२४: आमच्या सगळ्यांकडून जितकी होईल तितकी प्रदर्शनाची बातमी आम्ही व्हायरल केली तरी पण पेपरला बातमी द्यावी अशी इच्छा होतीच. परागने (सांध्याचा मुलगा) या बाबतीत मदत केली. त्याच्या एका मित्राचा फोन नंबर दिला. मी त्याच्याशी बोलले मात्र पुण्याचे आणि ते ही सकाळ पेपरचे रेट खूप जास्त होते, पण नशिबाने ती फोनवर बोलणारी मॅडम खूप चांगली वाटली. तिने बजेट सांगितल्यावर त्यातल्या त्यात छान पर्याय सुचवला. चार ओळींचीच पण रंगीत बॅकग्राऊंड वर असल्यामुळे लक्ष जात होतं. दोन दिवस जाहिरात आली ३,५७० रु. लागले.
व्हिडिओचं काम त्याच्याच मित्राने केलं. यासाठी रचनांची मदत झाली. तिने व्हिडिओ छान केला मात्र फोटो नीट नाही काढले पण साधनाने हे सुद्धा काम मस्त केले.
पहिल्या दिवशी आम्ही जेवूनच जायचे ठरवले होते. त्याप्रमाणे संध्याच प्लॅनिंग होतंच. पटकन जेवणं आटोपून १० पर्यंत आम्ही मनीषाकडे पोचलो. आम्ही तिघी बहिणी, राजेन्द्रराव, मनीषा असे सगळे कामाला लागलो. मनिषाने ऑर्डर दिलेले भाड्याचे टेबल, चादरी आल्याचं होत्या. आम्ही ५० बॉक्सेस उघडून त्यातल्या वस्तू काढणे, कुठे काय लावायचं याची जुळवा जुळव सुरु झाली. आधी आम्ही असं ठरवलं होतं कि अमरावतीलाच हे सगळं प्लॅनिंग करायचं पण इतक्या ७८० वस्तू घरात मांडून बघणे अशक्य होते आणि तेवढा वेळही नव्हता. आमची धावपळ पाहून प्रफुल्ल नावाचा आमचा ड्राइवर सुद्धा रात्री साडे नऊ पर्यंत आम्हाला वस्तू लावू लागला. आम्हाला त्याचं खरोखर कौतुक वाटलं. हॉल मध्ये मावत नव्हतं म्हणून शेजारची एक खोली घेतली पण तरीही रुमालांना न्याय देता आला नाही. सगळे एकावर एक ठेवावे लागले. शिवाय बाहेर सुद्धा ४ टेबल टाकायचे असं ठरलं. हॉल मध्ये फोकस लाईट हवा होता, तो लावला. मनीषानेच तात्काळ वायरमन बोलावून हे काम केलं, एकंदर तिच्यावर खूप म्हणजे खूपच कामं पडली, त्यात त्यांनी जेवणाचीही स्वतःकडे घेतल्यामुळे मला फारच ओशाळल्या सारखं झालं होतं
हॉल स्वच्छ करणे, मागे पडदे लावून त्यावर पिनांनी तोरणं लावणे, भाड्याने आणलेल्या चादरी पांढऱ्या होत्या काही वस्तुंना काळा बॅकग्राऊंड हवा होता तशा साड्या मी अमरावतीहून नेल्या होत्या त्यावर योग्य ती वस्तू ठेवणे. ....
रात्री साडे नऊला अत्यंत थकलेले आम्ही सगळे एका हॉटेल मध्ये जेवलो. जेवण छान होत. घरी संध्याच्या मांजरी तिची वाट बघत होत्याच. इतकं थकलेलो असूनही थोड्या गप्पा झाल्याच मग झोप. यात आम्ही सुनील अपर्णा ला खूप मिस करत होतो.
साधनाने सगळ्या वस्तूंचे फोटो काढले, त्या पैकी काही,
फिंगर पपेट साठी कागदाचे फिंगर्स करावे असं अमरावतीलाच ठरवलं होतं पण विसरले. मग आदित्यला (मनीषाच्या मुलगा) सांगितले त्याने त्या प्रमाणे करून दिले. अस्मिताकडे (मनीषाची मुलगी) रोजचा चहाचा कॉन्ट्रॅक्ट होताच. कधी घरच्या आंब्याचं पन्हं काय, कधी आईस्क्रिम काय!! आज्यांची रोज मज्जा होती.
अमरावतीच्या आमच्या प्लॅनिंग मध्ये तीन दिवस कोणकोणत्या साड्या नेसायच्या हे सुद्धा ठरलं होतं. त्या प्रमाणे आम्ही सकाळी पटापट तयार होऊन, नाश्ता करून साडे आठलाच मनीषाकडे पोचलो.
नऊ वाजता व्हिडिओ काढणारी "भुवनेश्वरी" नावाची मुलगी येणार होती. ठरल्या प्रमाणे ती आणि तिचा एक सहकारी आला. त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. वरील व्हिडिओ हा तिनेच शूट केलेला आहे.
मनिषाने आठवणीने सगळ्यांसाठी गजरे आणि बिलिंग च्या टेबल वर ठेवण्यासाठी सोनचाफ्याची फुलं आणली होती. आमची तयारी पूर्ण .....
बरोबर १० वाजता उदघाटन करायचे ठरले. ज्योत्स्ना ताईंच्या हस्ते उदघाटन करणार होतो. त्यामुळे आमचे पाहुणे वेळेवर आलेले होतेच. उदघाटन झाल्यावर त्यांना शाल, श्रीफळ आणि गजरा दिला. प्रदर्शनाला कसा रिस्पॉन्स मिळेल हि एक काळजी होतीच पण ९.४५ लाच लोक यायला सुरवात झाली होती. आम्हालाच त्यांना विनंती करून १५ मिनिटं थांबवावे लागले आणि हे सत्र सतत सुरूच होते. अगदी आम्हाला जेवायला सुद्धा दोघी दोघीना वर जाऊन जेवावे लागले.
येणाऱ्या सगळ्यांना अभिप्राय लिहा, हे म्हणण्याचं काम पूर्णपणे रजुने केलं. शिवाय गर्दी झाल्यास ती बील बनवण्यात राजेंद्र रावांना मदतही करत होती.
आता सगळ्यात महत्वाचा भाग लिहायचा तो म्हणजे कलोपासक च्या SUBSCRIBERS (सख्या) बद्दल. त्यांनी मला त्या तीन दिवसात दिलेला अनुभव म्हणजे माझ्यासाठी जन्मभराचा अमूल्य असा ठेवाच होता. त्यांचं प्रेम पाहून कितीदा डोळे पाणावले तर कितीदा शब्द सुचेनासे झाले. लोक किती प्रेम करतात आपल्यावर!! आपण खरंच त्या लायकीचे आहोत का? अगदी असाच अनुभव मला माझ्या SEND - OFF ला आला होता. विद्यार्थी आपल्यावर इतकं प्रेम करतात कि आपण खरंच त्या लायकीचं आहोत का, असं वाटायला लागलं होतं. सख्यांनी कौतुकाचा नुसता वर्षाव केला होता, अगदी बारीक बारीक गोष्टींचं कौतुक.... खर तर इतकं कौतुक ऐकायची सवयच नाही.... अगदी भरून येत होतं. प्रत्येकजण सेल्फी काढत होत्या, काहींनी तर गिफ्ट आणलं होतं, गुरु म्हणून मला वाकून नमस्कार करत होत्या, मला ते घेणं फार ऑकवर्ड झालं, पण प्रेमाच्या आग्रहापुढे काही चालत नव्हतं.
पुण्यात सुद्धा खूप दुरदुरून अगदी वाघोली, चिंचवड हुन त्या सख्या आल्या होत्या. इतकच नाही तर अगदी बारामतीहून, किर्लोस्कर वाडीहून, साताऱ्याहून, अलिबागहून, कल्याणहून सुद्धा सख्या आल्या होत्या. काय म्हणावे या प्रेमाला!!! उपमाच नाही नं!! इतक्या दुरून कुणी नवऱ्याला, कुणी मैत्रिणीला, कुणी बहिणीला घेऊन आल्या होत्या. फक्त मॅडमला भेटायचं म्हणून.... कुणी येता आलं नाही... जसं प्रमिला येणार होती पण तिचा अपघात झाला म्हणून व्हिडिओ ने संवाद साधला. अशा अनेक होत्या... कसं या प्रेमातून उतराई व्हावं?
काही फोटो पहिल्या दिवसाचे....
१८ फेब्रुवारी २०२४: दुसरा दिवस: बऱ्याच वस्तू पहिल्या दिवशी विकल्या गेल्या मुळे आज आम्ही वस्तू पुन्हा rearrange केल्या. त्यात बाहेरचे ४ टेबल काढून टाकले. आमची टीम पुन्हा सज्ज!!!!
प्रदर्शनामुळे खुप दिवसांनी भेटी झाल्या, जुने ऋणानुबंध पुन्हा एकदा घट्ट झाले.
१९ फेब्रुवारी २०२४:
दोन दिवसाचा खूप चांगला अनुभव होता आता आणखी एक खोली कमी करून आम्ही आल्याबरोबर उरलेल्या वस्तू पुन्हा अरेंज केल्या. आता doilies ना चांगलं मोकळं मोकळं ठेवता आलं.
हे चारही दिवस आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय करत करत न थकता पूर्णपणे उभ राहून काढले. ज्यांना ज्यांना आम्ही ३-३ दा मेसेज केले होते ते सगळे नातलग माझे, साधनाचे, संध्याचे आणि रजुचे सुद्धा न चुकता आले आणि त्यांनी बरीच खरेदीही केली. मनीषाच्या मैत्रिणी, तिचे नातलग ते ही सगळेच आले. या शिवाय काही जाहिरात वाचून तर काही फ्लेक्स पाहून सुद्धा आले होते.
NOW PACK UP!!! म्हणायची वेळ आली होती.
अगदी शेवटच्या दिवशी सात वाजेपर्यंत सुद्धा कुणी न कुणी येतच होत्या. शेवटच्या अर्ध्या तासातली गर्दी ...
आमची संपूर्ण टीम.
सात वाजल्यावर मात्र आम्ही सगळं आवरायला घेतलं. अंशुमन रावांपासून सगळे आवरण्याचा कामास लागले. भराभर सुटकेस मध्ये सगळं भरलं. सगळे खोके कचरेवाल्याला देण्यासाठी एका जागी नेऊन ठेवले, समोरची जी खोली आम्ही चहा प्यायला वापरत असू तिथे सगळे खोके पडले होते, ते उचलून खोली साफ केली. प्रफुल्ल च्या मदतीने टेबल चादरी एका ठिकाणी ठेवल्या. साडे आठला वर जेवायला गेलो. जेवण आटोपून सव्वा नऊ ला निघालो. संध्याकडे जाऊन आप आपलं सामान आवरलं. बरोबर पावणे दहाला तिथून निघालो.
स्वप्नपूर्तीचा एक आनंद तर होताच पण सगळ्यांच्या सहकार्याचा, सख्यांच्या प्रेमाचा जो अनुभव घेतला होता तो खरोखरच अविस्मरणीय होता.























.png)
.png)
.png)













.jpg)

फारच सुंदर वर्णन केले आहे आणि भरपूर छायाचित्रे दिल्यामुळे आपण प्रदर्शन पाहतो आहोत असे वाटते.माझ्या कोणत्याही नातेवाईकाचे असे प्रदर्शन आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहिला नव्हता . तो पाहायला मिळाला . सर्व बहिणी मेव्हणे भाचे मंडळी यांचा सहभागही आनंदाचा होता , आपली बहीण इतकी विद्वान आणि कलावंत आहे याचा अभिमान वाटतो . कौतुक करावे तितके कमीच आहे
ReplyDeleteप्रकाश भाऊ, खूप खूप धन्यवाद. मोठा भाऊ सगळ्यात हुशार असल्याने धाकट्यांना थोडं हुशार व्हावंच लागतं .
ReplyDeleteप्रकाश भाऊ, खूप खूप धन्यवाद. मोठा भाऊ सगळ्यात हुशार असल्याने धाकट्यांना थोडं हुशार व्हावंच लागतं .
ReplyDelete