Saturday, April 6, 2024

Kalopasak's Crochet Articles Exhibition at Pune Part 1


Hello friends, 

Such a long gap for my post, the reason is I was in a planning of organizing an "Exhibition cum Sale" at Pune. That EXPERIENCE was very very special for me and I think for the whole team too. As an experience it's a LIFE TIME ACHIEVEMENT. 

I spent my 2-3 months in that and my team also spent nearly 15 days for me. I knew that it's definitely a team work hence I had decided to do it when my younger sister Sadhana (who lived in my city) will get retired from her job. 

When I told the whole experience to my daughter and told her that it was the life time achievement then she immidiately told me to write that experience as she knew my habbit of forgetting. That's why I also think that I should write this experience and share it with my friends. So that they will also enjoy and experience the hard task behind it for the 70 year old person. It's simply a team work.

Initially I wrote this in my mother tong. Google is ready to translate it for you and make you possible to take this experience. If time permits I may write in English.

Exhibition an Amazing Experience

प्रदर्शन: एक अविस्मरणीय अनुभव 

31 मार्च 2017 शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतून 39 वर्ष गणित विभागात प्राध्यापक म्हणून आणि 2005 पासून विभाग प्रमुख म्हणून काम करून निवृत्त होण्याचा दिवस. करीअरचा एवढा मोठा कार्यकाळ सतत अभ्यास, रिसर्च  (माझ्या मार्गदर्शनात 11 विद्यार्थ्यांना Ph. D. मिळाली) शिवाय मुलं, संसाराच्या जबाबदार्‍या पार पडत कसा निघून गेला कळलंच नाही. निवृत्तीनंतर लगेच अमेरिकेत गेलो तिथल्या वास्तव्यात मुलगी आणि सुन यांनी बघितलं की आई सतत काही न काही करत  असते, नुसतं शांत बसणं आईला जमत नाही शिवाय आई बर्‍यापैकी टेक्नोसावी आहे म्हणून त्यांनी ब्लाॅग सुरू करण्यासंबंधी सुचवलं. त्या नुसार मी तिकडून आल्यावर जुलैत ब्लाॅग सुरू केला. मी ही फावल्या वेळात व्हिडिओ वगैरे पाहू लागले. काॅलेजमुळे तरूण मुलींशी बराच संबंध आला होता आणि एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्याला या वयात  निटींग,  क्रोशे या सारख्या पारंपरिक कला अवगत होत्या. त्या आजच्या पिढीला येत नाही. तेव्हा तरूणींना ज्या माध्यमातून शिकायला आवडेल तसं ते त्यांच्या पुढे आलं पाहीजे आणि माझ्या लक्षात आलं की  आपल्याकडे युट्यूब जास्त बघतात. मग मी युट्यूब चॅनल सुरू करायचं ठरवलं. मग ते मराठीत असावं की इंग्लिश मधे हा विचार केला आणि शेवटी मराठीत सुरू करायचं ठरवलं कारण 
1. इंग्लिश खूप चॅनल आहेत 2. जसा तरूणींचा विचार केला तसंच मध्यम वयीन  स्त्रियांनाही (ज्यांना प्राथमिक माहिती आहे) त्यात आणखी नवनवीन करावसं वाटतं त्यांच्यासाठी  चॅनल मराठीतच असणं जास्त योग्य...
नाव काय असावं? यावरही विचार केला. सुरवातीपासून निटींग,  क्रोशे, टॅटींग हे सगळंच शिकवावं असं ठरलं होतं. मग अशा सगळ्या कलांवर प्रेम करणारा म्हणजे कलेचा खरा उपासक, "कलोपासक" हेच नाव ठरलं.
1 मे 2018 ला कलोपासक हे युट्यूब चॅनल सुरू केलं.
सुरवातीला मलाही खूप शिकावं लागलं. व्हिडिओ चे तुकडे जोडायचे कसे? सबटायटल्स कसे द्यायचे वगैरे...
गुगल गुरूनी प्रत्येक अडचण दूर केली आणि चॅनल व्यवस्थित सुरू झालं.
पाच वर्षांत 40,000 च्या वर subscribers ही झाले पण बनवलेल्या वस्तुंपैकी काहीच विकलं नव्हतं. मनात कुठेतरी होतं की एकदा आपण यांचं प्रदर्शन लावू आणि मग विकू. हळुहळू ते माझं एक स्वप्नच झालं. पण मी ठरवलं होतं की माझी धाकटी बहीण निवृत्त झाल्यावर च प्रदर्शन लावू शकतो कारण ते एकटीचं काम नाहीच, टीम वर्क आहे. 
मनात प्रदर्शनाचे विचार सुरू झाले. 
केतकीने (माझी भाची) लोगो केला. सुयांचा A ,लोकरीनेच लिहिलेली KALOPASAK ही अक्षरे. (ही  आयडिया मला फारच आवडली) आणि खाली ALKA GUDADHE असं लिहीलं होतं.कलोपासक ची मेहेरप ही एक कलाकृती बॉर्डर म्हणून वापरली होती.   तिने त्यात एक QR Code पण बनवला होता जो स्कॅन केला कि डायरेक्ट कलोपासक चॅनल वर घेऊन जातो. जबरदस्त नं !!!! पूर्ण डिझाईन मला खूप आवडलं. पण ते मला डार्क करत येईना. केतकीही जर बिझी होती (अमेरिकेत असते). 


म्हणून मी सुनीलला, माझ्या भावाला सांगितलं कि बरेच दिवसापासून मला व्हिडिओ चं फ्रंट पेज बदलायचं होतं. तर त्याने एक सुंदर फ्रंट पेज केलं आणि ETC: Enjoy The Creativity ही टॅग लाइन बदलून त्या ऐवजी मराठीत "धागा धागा अखंड विणू या" ही टॅग लाइन दिली. चॅनल मराठी असल्यामुळे ही लाईन एकदम सूट होती. मी आपलं माझ्या गणिती डोक्याने ETC: Enjoy The Creativity अशी टॅग लाईन टाकली होती.   मला सुनीलची  मनापासून खूप आवडली. 


 पण इंग्लिश मधेही कलोपासक ही अक्षरं असावीत असं वाटलं म्हणून  मग केतकीचं लोकरीत लिहीलेलं KALOPASAK आणि सुनीलची ही टॅग लाइन, त्याने टाकलेली doily असं फ्रंट पेज तयार झालं. 

फ्रंट पेज / लोगो हे तर झालं, मग प्रदर्शन कुठे करायचं हे मंथन सुरु झालंअमरावती ला शारदा उद्योग मंदीर ची मी कोषाध्यक्ष आहे, त्या मैत्रीणी तिथे बांधलेल्या नवीन हाॅलमधे प्रदर्शन लावावं या साठी आग्रही होत्या. माझ्या पुण्याच्या बहिणीचं मत होतं की पुण्यात प्रदर्शन केलं तर जसा प्रतिसाद मिळेल तसा इतरत्र मिळणार नाही. 
झालं, शेवटी प्रदर्शन पुण्यात करायचं हे ठरलं👍
पहिलं काम हाॅल संशोधन... पुण्याच्या भाचीने ते काम सुरू केलं सुध्दा.... पण पुण्यात हाॅलची भाडी एवढी जास्त होती की एकटीचं प्रदर्शन लावणं, परवडण्या सारखं नव्हतं.. रोज ती मला 2-2 हाॅलच्या भाड्यासंबंधी फोन करून सांगू लागली... हाॅल संशोधन सुध्दा वर संशोधना इतकंच कठीण आहे, हे आमच्या लक्षात आलं. शेवटी आम्ही पुण्याचा नाद सोडून दिला.... अमरावतीतच करायचं ठरलं.
भाचीच्या सासुबाई, आमचं मावशी भाचीचं संभाषण ऐकून म्हणाल्या की अमरावतीत प्रदर्शन करण्यापेक्षा तुम्ही आपल्याच वाचनालयाच्या हाॅल मधे प्रदर्शन का लावत नाही? मी तर आनंदाने उत्साहित झाले. त्यांचे किती आणि कसे आभार मानावे मला कळत नव्हतं. ठरलं तर मग... प्रदर्शन पुण्यात होणार..... आणि ते ही सदाशिव पेठेत... हे ठरलं. 
तारीख आधी डिसेंबर घ्यावी असं वाटत होतं. हवामान छान असतं आणि प्रदर्शनाचा सिझन असतो असं म्हणता येईल. पण ऋचा (साधनांची मुलगी जी अमरावटीतच असते) तिच्या कॉलेजमध्ये परीक्षेची इन्चार्ज होती, ३१  जानेवारी पर्यंत परीक्षा  होती म्हणून फेब्रुवारीत करायचं ठरलं. मनीषाला तिच्या मुलांच्या परीक्षा वगैरे आहेत का ते विचारून  तारीख ठरली 17, 18 आणि 19 फेब्रुवारी 2024.
एकदा स्थळ आणि तारीख  पक्की झाल्यामुळे पुढच्या कामाला गती आली.  
एक छानसं पॅम्पलेट डिझाईन बनवलं. आधी तयार झालेलं  फ्रंट पेज  (ते आता माझ्या साठी बेस डिझाईन झालं होतं) आणि मी बनवलेल्या कलोपासक च्या काही वस्तू हे घेऊन मी एक डिझाईन बनवलं.  

मी बनवलेल्या डिझाईन मध्ये थोडा बटबटीत पणा होता. माझा भाऊ सुनील यात expert आहे, तो चांगला आर्टिस्टच आहे. त्याचा हात लागल्यावर काय विचारता!! खूप सुंदर असं पॅम्प्लेट तयार झालं.

हे मी जाहिरातीसाठी वापरणार होते म्हणून मी स्वतः ते माझ्या ओळखीच्या सगळ्यांना whatapp केलं आणि त्यांच्या पुण्याच्या सगळ्या नातलगांना, मित्र, मैत्रिणींना पाठवायला सांगितलं.  माझ्या बहिणी साधना, संध्या आणि मैत्रीण रजनी यांनी ते viral करायला सुरवातही केली. 
आता सगळ्यात अवघड प्रश्न होता किंमत ठरवण्याचा. कारण त्याला थोडा तरी अनुभव हवा. आमच्या पैकी कुणीच ना कधी विकलं, ना विकत घेतलं (कारण आमच्या मते, अं! हे काय आपणही करू शकतो.) त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 
किमती ठरवण्यासाठी आधी मी सगळ्या वस्तूंची Excel sheet बनवून सगळ्या वस्तुंची यादी केली. इथे मी फक्त पाहिलं पेज शेअर करते अशा ७७५ वस्तूंची भलीमोठ्ठी यादी (काही डबल असल्यामुळे अन्यथा ७८०) तयार झाली. 


त्यात सिरीअल नंबर, व्हिडिओ चा नंबर वगैरे.... त्यावरून लक्षात आलं की जवळपास 750-780 वस्तू आहेत. (म्हणजे सिंगल सिंगल धरले तर, सेट म्हणून धरलं तरी 700 च्या वरच आहेत). प्रदर्शन लावण्या इतकं आपलं काम आहे, याची खात्री झाली...   
तयार वस्तू एकदा चेक करणं सुरू झालं. त्यापैकी काही कुणाला दिल्या गेल्या होत्या त्याच्या पुढे झिरो किंमत लिहिल्या गेली (कारण ते सगळ्यात सोप्पं होत). Price Tag विकत आणले. तसा टॅग लावणे ही कामं केली. ते करतांना लक्षात आलं कि कशाचे मोती पडले आहेत का? कशाचे दोरे हाइड करायचे राहिले आहेत का? काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करणं सुरू झालं....या कामात सुजाताची मदत झाली. 
फिंगर पपेट मधे 10 पैकी 3 नातवांना दिले होते असं लक्षात आलं.... म्युझिक सिस्टीम 2 आहेत पण खालचा गालिचा एकच होता... फळाची आणि भाजीसाठी 2 वेगवेगळ्या प्लेटस् नाहीत.... "श्री राम जय राम जय जय राम" चं तोरण गिफ्ट म्हणून दिल्या होतं.... अशा अनेक  वस्तू मला पुन्हा कराव्या लागल्या.
एकीकडे त्या वस्तू करणं सुरू झालं...
तर दुसरीकडे सगळ्या वस्तुंवर किमती टाकायच्या होत्या. त्यासाठी Price Tag तर आणले पण कधी विकण्याचा अनुभव नसल्यामुळे फार कठीण गेलं. साधना (माझी धाकटी बहीण) 4-5 दिवस रोज येत होती आणि 4-4 तास बसून आम्ही किमती ठरवणे, वस्त्तुवर त्याचा टॅग लावणे व excel sheet मधे त्या किमतीची नोंद करणे ही कामं पूर्ण केली. नंतर ज्या professional  आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यावर लक्षात आलं की काही doilies वर किंमत बरीच कमी टाकल्या गेली आहेत मग त्या किमतीचे टॅग बदलले. यात सुजाताची (काम करणारी बाई) बरीच मदत झाली. 

झालं आता पुण्याची तयारी सुरू झाली. प्लॅस्टिक दोरी, टाचण्या, सेफ्टी पीना, ड्राॅइंग पीनस्, फॅब्रीक ग्लू,  स्टीक फास्ट, साध्या टाचण्या इ . खरेदी झाली जवळपास रोज बाहेर जावं लागत होतं . हे सगळं ठेवायला प्लास्टिक चा मोठा डबा, एक मिडीयम साईझचा आणि एक सुटे पैसे परत देण्यासाठी वेगवेगळी नाणी ठेवायला ४ खणी डब्बा. ही सुद्धा खरेदी एक दिवस झाली. 
एकीकडे ही काम सुरु असतांना ह्यांच्या पैशांचं काम अजून झालं नसल्यामुळे ट्रेझरीत , बँकेत चकरा मरण ही personal काम सुरूच होतं. 
जाहिरातीच्या दृष्टीने एक मिनिटाचा व्हिडिओ बनवला. या प्रदर्शनात आपल्याला काय काय बघायला मिळेल हे त्यात होतं. आधी .ppt बनवून मग त्याचा व्हिडिओ आणि नंतर त्यात आवाज टाकला. 

https://youtu.be/u4P9kFBLKiU


ज्यांना ज्यांना जाहिरातीचं पॅम्प्लेट पाठवलं होतं त्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवण्यात आला. एक तर त्या मुळे पुन्हा आठवण दिल्या सारखं झालं आणि त्यांना प्रदर्शनाबद्दल डिटेल्स कळल्याने त्यांची उत्सुकता वाढली. खूप जणींचे त्यावर रिप्लाय सुद्धा आला कि इतके वेगवेगळे प्रकार क्रोशाने केलेले कधी बघितले नव्हते... वगैरे... बरं वाटलं आणि येतील लोक बघायला याची हळू हळू खात्री वाटायला लागली. 
जाहिरातीच आणखीन एक काम मनिषाने केलं. त्या पेजच्या  प्रिंट आउट काढून पुण्याच्या प्रसिद्ध सम्राट मेगा स्टोअर्स मध्ये नेऊन दिल्या आणि त्यांच्या दुकानात लावण्याची विनंती केली. सम्राट च्या मालकांनाही धन्यवाद कि त्यांनी ती दुकानात तीन ठिकाणी लावली. नंतर ४-५ जणींनी फोन करून संपर्क सुद्धा साधला होता आणि प्रदर्शन बघायला नक्की येऊ असं म्हणाल्या होत्या. 

तयारीचा पुढचा टप्पा म्हणजे Kalopasak असं लिहिलेल्या कापडी पिशव्या आणणे. त्या साठी बराच सर्व्हे करावा लागला, कारण रेट जास्त होते. प्रदर्शनातून उत्पन्न किती होणार, होणारही कि नाही, काही माहित नसल्यामुळे जास्त खर्च होऊ नये अशी इच्छा होती. तशा प्लॅस्टिक पिशव्या खूप स्वस्त होत्या पण "SAY NO TO PLASTIC" हे डोक्यात फिट! त्यामुळे  शेवटी एका ठिकाणी ५०० रु / १०० अश्या दराने पिशव्या घेऊन त्यावर फ्रंट पेज छापून घेतलं. श्री डबरे यांनी छपाईचं काम उत्तम केलं. 

त्यांच्याकडून दोन बिल बुकही बनवले. एकदम प्रामाणिक!!! हो, आम्ही बील सुद्धा देणार होतो. अगदी कुणी online payment करायचं म्हटलं तरी त्याची सोय मी केली होती. मी माझा QR Code स्कॅन करून घेतला scanner , printer सगळं घरीच असल्यामुळे प्रश्नच नव्हता. त्यासाठी स्टॅन्ड सुद्धा पाहून आले पण २०० रुपयाचा, मग कॅन्सल, साधनांकडे मोबाईल स्टॅन्ड होता तो वापरला.  आपला QR Code बरोबर काम करेल कि नाही माहित नव्हतं म्हणून त्याची ट्रायल घ्यायला राजेंद्र रावांना QR Code वापरून १ रुपया ट्रान्स्फर करायला सांगितला . SUCCESSFUL Transaction !!! खुद्द बँकेचे मॅनेजर (retired) आमच्या साठी कॅशिअरचं काम करणार होते. मग काय विचाराता ? त्यात त्यांचं सुंदर अक्षर त्यामुळे एकेक बिल सुंदर अक्षरात तयार होणार होतं.  


येणाऱ्यांना अभिप्राय लिहिण्याची विनंती करावी असं वाटत होतं. त्यासाठी मी एक कोरं रजिस्टर आणून ठेवलं होतं. कॉलेजमध्ये असतांना कॉन्फरेन्स मध्ये ठेवतात तसं किंवा आम्ही शारदा उद्योग मंदिरात सुद्धा ठेवतो त्यामुळे ते मीआठवणीने आणले. नंतर ज्योत्स्नाताई सुद्धा म्हणाल्या कि आपण एक अभिप्राय पुस्तिका ठेऊ म्हणून मग मला आणखी उत्साह आला आणि मी एक सुंदर प्रिंटेड अभिप्राय पुस्तिका विकतच आणली. असं कुणी म्हटलं कि आपला उत्साह वाढतो, नाहीतर आपणच आपलं कौतुक तर करायला सांगत नाही नं ? असं वाटून मी थोडी कचरत होते पण ताईंनी दुजोरा दिल्याने तेही काम मस्त झाले. 
शिवाय प्रदर्शनाच्या ठिकाणी समोर लावायला ४ फूट X ३ फूट असा एक फ्लेक्स बनवून घेतला.

त्या फ्लेक्स वर माझा फोटो टाकावा कि टाकू नाही या विचारात शेवटी टाकलाच नाही. फोटो टाकावा असं एकदा वाटत होतं कारण माझ्या युट्युब चॅनेलचा डी पी माझा फोटोच आहे. पण जेव्हा ७० व्या वर्षी आपण असं एखाद धाडस करायचं ठरवतो तेव्हा वाटतं लोकं म्हणतील इतक्या म्हातारपणी बाईला फोटोची हौस काही कमी होत नाही. अशा वेळेस वाटतं मुलं जवळ असती आणि म्हणाली असती, टाक नं आई, तू काहीही विचार करते, तर मग आपल्याला इमोशनल सपोर्ट मिळतो आणि कदाचित मी टाकालाही असता. पण शेवटी बिना फोटोचंच सुंदर  फ्लेक्स तयार झालं आणि फोटोची गरज नव्हती हे लक्षात आलं. डबरे यांनी उभ्या पम्पलेटचंच ४x ३ फूट फ्लेक्स केल्यामुळे नजरेला थोडं खटकत होतं पण मी ते तसंच ठेवायचं ठरवलं कारण त्यात आणखी वेळ घालवायला माझ्याकडे नव्हता. 
नेमकं तेव्हाच साधनांकडे वॉल कंपौंडच काम सुरु होतं, पाव्हणे ३-४ दिवस राहायला येणार होते त्यामुळे ती ही खूप बिझी होती तरी तिला मी फोन करून काही न काही विचारायचेच. या सगळ्याचं माझ्या न कळत माझ्यावर प्रेशर आलं होत. मला रात्री झोप येत नसे. आपण सगळ्यांनाच खूप म्हणजे खूपच त्रास देतो आहोत हे सारखंच मनात येत राहायचं. साधना, राजेन्द्रराव, ऋचा , शेखर अगदी अद्वैत सगळ्यांना आपापली काम सोडून निव्वळ माझी इच्छा म्हणून ६-७ दिवस द्यावे लागणार होते. तिकडे संध्या, मनीषा आणि ज्योत्स्नाताई सुद्धा खूप त्रास घेत आहेत आणि त्या तर जेवणही त्यांच्याकडे करा म्हणत होत्या. या सगळ्या मुळे माझं प्रेशर आणखीनच वाढत होतं .

आधी एक माझी आणि एक साधनाची अश्या २ गाड्या नेणार होतो पण त्यांची गाडी राजेन्द्रराव चालवणार, त्यांना आणखी त्रास द्यायला नको म्हणून शेवटी भाड्याची इंनोवा गाडी करून ती चार दिवस मुक्कामी ठेवायचं ठरवलं. मग गाडीचा शोध सुरु.....  शेखरच्या ओळखीची, चेतनच्या मित्राची (चेतन म्हणजे आमच्या नेहमीच्या ड्राइवर चा मामा), माझ्या ओळखीची असे भाव टॅली करणं सुरु झालं. शेवटी माझा नेहमीचा राहुल त्याचीच इंनोवा सांगितली. २७-२८ हजार लागतील असं बजेट सांगण्यात आलं. माझी मैत्रीण रजनी (रजू) सुद्धा खास प्रदर्शनासाठी अमरावती हुन पुण्याला येणार होती. आधी ती एकटीच आमच्या गाडीत येणार होती पण नंतर ते दोघं येणार असं ठरलं आणि सामान इतकं होतं कि ते शक्य नव्हतं. म्हणून ते दोघे १५ तारखेला रात्री निघून बसने सकाळी पुण्याला पोहोचणार होते. काय म्हणावं इतकं आपल्यावर प्रेम करणारी माणसं देवाने आपल्याला दिली आहेत. या बद्दल पुन्हा एकदा त्याचे धन्यवाद मानावेसे वाटले. 
 सगळेच खूप प्रेमाने करतात आहेत हे दिसत होतं पण एकीकडे मन खात होतं . हे सगळं प्रेशर बी. पी वाढू न देता मी सहन करू शकले या बद्दल तर देवाचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. 

आता महत्वाचं काम होतं पॅकिंगचं.....
आपण हाताने बनवलेल्या सगळ्या वस्तुंवर आपलं खूप प्रेम असतं. कोणतीही वस्तु दबायला नको यासाठी वेगवेगळ्या आकाराचे डबे आणणं, त्यावर आतल्या वस्तुंची नावं टाईप करून त्या चिठ्या लावणं, चिकट पट्टीने ते पॅक करणं, त्यावर नंबरींग करणं, असे लहान डबे मोठ्या डब्यात टाकणं, त्यात कोणत्या नंबर चे डबे आहेत याची नोंद करणं अशी एक ना दोन  कित्येक काम मी एकामागून एक करत होते. कंबर दुखत होती पण स्वप्न पूर्ण करण्याची ओढ होती.
 


List of Organized Items

No

Box No

Description

Total Items in this Box

 

1

Suitcase 1

Doilies

79

 

2

Suitcase 2

Doilies Medium size

42

 

3

Suitcase 3

Table Runner 8, Dinning set 9, Tea coaster 4+4+2

27

 

4

Suitcase 4

Toran 30

30

 

5

Airbag

Bags 49

49

 

6

Bag rectangular

Frock2, single sweater 10, Cap 5, Boot 5, Sleeping bag 1, set 9, (18 items)

41

 

7

Box 1

Adult’s sweater 4, shawl+Poncho 5+ Boot 4, socks 2, handgloves 2, Scarf 2, Caps 2

21

 

8

Box 2

Kalash, Coconut, Mango leaves 5

3

 

9

Box 3

Swan pair

2

 

10

Box 4

Aakash dive 4, Small Kandil 6

10

 

11

Box 5

Aquirium

1

 

12

Box 6

Mother’s Day tree with 3 birds

1

 

13

Box 7

Chimanal with 5 sparrow

1

 

14

Box 8

Kunkavacha Karanda

1

 

15

Box 9

Rakhi

30

 

16

Box 10

Christmas Tree

 

 

17

Box 11

Vidyache paan 1, supari 2

3

 

18

Box 12

Handkerchief with lace crochet+ shuttle

10

 

19

Box 13

Earrings 12, Set 2, Bangle 1, Hairband 1, Hand accessory 1

17

 

20

Box 14

Fruits 12

12

 

21

Box 15

Vegetables 13

13

 

22

Box 16

Ganapati Decoration: Haar 9, Shele 3, Shawl 2, vessals 2, Glass 1, Small Toran 1 and flower 1

19

 

23

Box 17

Small Aasan for God Idol or flower pot 21

26

 

24

Box 18

Samai Rangoli+ Candle holder 27, Wall hanging 5, Diwali Panati stand 1

33

 

25

Box 19

Finger puppets 10

10

 

26

Box 20

Cushion Cover 2

2

 

27

Box 21

Chair Back2

2

 

28

Box 22

Pujech Tabak: Plate1, Niranjan 1, Udbatti ghar 1, Panchpatra1, pali1, Kuiri, Supari 1, Ful1, Durva, Bel1,

10

 

29

Box 23

Pujech Tabak: Plate1, Niranjan 1, Udabatti ghar1, kalash1, panchpatra1, Ful, Durva, Bel

8

 

30

Box 24

Diwali Faral

8

 

31

Box 25

Banana Leaf Food Items

10

 

32

Box 26

Meherapi

27

 

33

Box 27

Lotus Doily Big 1, Water pond 3, Fruit plate 1, Vegetable plate1, Big heart 1

7

 

34

Box 28

Wind Spinner 1

1

 

35

Box 29

Shivling 1, Chourang 1, Bel1, Ful 1

4

 

36

Box 30

Haldi Function Jewellary set 7

7

 

37

Box 31

Keychains

20

 

38

Box 32

Keychains 11

11

 

39

Box 33

Bookmarks, Appliques

17

 

40

Box 34

Zendu flowers 6, Leaves 6

12

 

41

Box 35

Cosmatic Organizer, Pen stand, Feather Toran

3

 

42

Box 36

Duck Mother 2, Ducklings 4

6

 

43

Box 37

Popcorn 10, Shenga 10, Candies 5, Cone 3

28

 

44

Box 38

Ice cream1, Cup cake2, Ball1, Tic tac toe 1, Stethoscope 1

6

 

45

Box 39

Musical Instruments 2 set (7 items each)

14

 

46

Box 40

Til Gul 4, Patamg 2, Halawa, Extra Shivling 1

8

 

47

Box 41

Chimanich Gharat Big 1 with 3 birds

1

 

48

Box 42

Modak 3, Karanji 2

5

 

49

Box 43

Birds 8, Bird house small1

9

 

50

Box 44

Diwali Panatya 6

6

 

51

Box 45

Laxmichi pawale 3, shankh2, Ghati 2, Vidyachi paan 3, Aaptyachi paan 4, bel 5, Flowers 2

21

Total till 52 Checked twice

52

Box 46

Sofa set

1

735

53

Box 47

Chafa 6, Sonchafa 6

2

 

54

Box 48

Gokarn 4 small+4 big, Katekoranti 6purple+6yellow+4white

2

 

55

Box 49

Two frames (Ganapati, Duck), Meherapi 27

29

 

56

Box 50

Loti Bhande, Cosmatic Organiser Pen stand, Feather Toran, Bill books, Title Plates, Doll, Gudhi1, Visitor’s book,

5

 

57

Box 51

Flower bunch 2, Rose buds bunch 1, Tulip bunch 1, Zarbera bunch 1,Shevanti bunch 1, Rain lily bunch 1, Jaswand flower and bud 2 sets

9

 

58

Box 52

Lotus bunch 1, Single lotus 1,  Sunflowers 2, Peace Lily bunch 1, Flower arrangement big 1, small 1

7

 

 

 

 

 

 

 

 

Total Items

789

 

 

 

 

 

 


एकेक करत शेवटी पॅकिंगचं काम पूर्ण झालं. Acquirium, काचेच्या २ फ्रेम, ज्योत्स्ना ताईचं गिफ्ट यांच्या साठी वेगवेगळं पॅकिंग करावं लागलं कारण ते सगळं काचेच्या बॉक्स मध्ये होतं. 



प्रदर्शनाच्या ठिकाणी ही थोडी कलात्मकता असावी म्हणून मी आणखी काही पाट्या केल्या, जसं , 


पाण्याच्या ठिकाणी "जरा विसावू या वळणावर" अशी पाटी केली. 

१५ तारखेला सकाळी जेऊन १०.३० ला निघायचं ठरलं. रात्री १० पर्यंत मनीषाकडे पोचू, सामान तिच्याकडे काढून संध्या कडे जायचं, मग १६ तारखेला सकाळी त्यांच्या कडे जाऊन सगळ्या वस्तू लावायच्या. १७, १८, १९ प्रदर्शन, १९ तारखेला रात्रीच निघायचं २० ला सकाळी अमरावती. असा प्लॅन ठरला.  
साधना आदल्या दिवशी आली होती आम्ही एकदा सगळं व्यवस्थित चेक केलं. त्याच दिवशी कळलं कि अदैतला गालगंड झाल्यामुळे शेखर आणि ऋचा येणार नाहीत. माझं प्रेशर आणखी वाढलं कि नातवाला बरं नसून साधना आणि राजेंद्र रावांना यावं लागतंय. पण काही इलाज नव्हता. कारण मी एकटी हे इतकं छान करूच शकली नसती. 


 
चला भेटू या पुढील भागात ..... 


No comments:

Post a Comment

Crochet Small Bag, Make in Any Size, Sankranti Special Sale As Many As You Can

  Hello friends, Here is the next Small Bag I made for Sankranti. Many of my friends sale such bags on order for      Sankranti Festival as ...